तुळजापूर / प्रतिनिधी -
जनतेचे व कार्यकत्र्यांचे मत विचारात घेवुन जो काही निर्णय घेतला जाईल तो जिल्हयाच्या  विकासाच्या दृष्टीने घेतला जाईल, असे प्रतिपादन माजी मंञी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले
तालुका रांष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवार दि 23 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रारंभी कार्यकत्र्यांचे प्रवेशा बद्दल मते जाणुन घेण्यात आली. त्यानंतर कार्यकत्र्यांना मार्गदर्शन करताना आ. पाटील म्हणाले की, सध्या तरी कुठल्याच पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही. जनतेच्या व कार्यकत्र्यांची मते, प्रतिक्रिया घेतल्यानंतर जो काही निर्णय घ्यायचा आहे तो सर्वांना विश्वासात घेवुन घेतला जाईल असे असे त्यांनी सांगितले. बैठकीत नगराध्यक्ष बापुसाहेब कणे,  दिपक आलुरे विक्रमसिंह देशमुख, वसंत वडगावे , विनोद गंगणे, विजय गंगणे, उत्तम लोमटे, नगरसेवक सचिन रोचकरी,  विजय कंदले, बाळासाहेब शिंदे,  जि.प.सदस्य  राजकुमार पाटील, पंचायत समिती सदस्य शरद जयदाड,े   चित्तरंजन सरडे, अमर चोपदार सह पदाधिकारी, , क  सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन,  कार्यकर्ते मोठ्या संख्ये ने उपस्थित होते.

 
Top