तुळजापुर/प्रतिनिधी-
 येथील घाटा‘या पायथ्याशी गर्द झाडीत अतिप्राचीन मुदगुलेश्वर महादेव मंदीरात प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी तुळजापुर येथील मुदगुलेश्वर प्रतिष्ठान ‘या वतीने दि.28 बुधवार रोजी महाअन्नदान सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.
गेली  वीस  वर्षापासुन  मुदगुलेश्वर प्रतिष्ठान‘या वतीने भव्य दिव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे. युवा प्रतिष्ठान‘या वतीने श्रावण माहिन्यात दररोज श्री मुदगुलेश्वर महादेव मंदीरात महादेवा‘या पिंडीची यथा सांग अभिषेक पुजा व विविध रंगा‘या आकर्षक फुलानी सजावट करून महाआरती करण्यात येते त्याचबरोबर वर्षभर प्रत्येक सोमवारी, महाशिवराञी दिनी मोठ्या भक्तीमय वातावरणात श्री महादेवा‘या मंदीरात भक्ती भावाने सेवा करतात प्रत्येक वर्षी श्रावण मासा‘या शेवट‘या क्षणी श्री महादेव मंदीरात महाअभिषेक करवून शि-याने महादेवाची पिंड लिंपून आकर्षक फुलांनी सजावट करुन मंदीरात आकर्षक  विविध रंगाची रांगोळी काढण्यात येते तसेच महादेवा‘या मंदीर परिसरात 20 ते 25 हजार शिव भक्तांना महाअन्नदान सोहळा करण्यात येत आहे. तरी शिव भक्तांनी महापुजेचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री मुधग्लेश्वर प्रतिष्ठा न ‘या वतीने करण्यात आले आहे.

 
Top