लोहारा/प्रतिनिधी-
धर्मवीर संभाजीराजे सामाजिक बहुउद्देशीय संस्था तुळजापूर संचलित निरीक्षण गृह /बालगृह उस्मानाबाद येथे मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य शिवसेना जिल्हा प्रमुख कैलास दादा पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यांत आले.
यावेळी प्रमुख म्हणुन तुळजापुर शिवसेना शहरप्रमुख सुधिर कदम, उस्मानाबाद जिल्हा बाल कल्याण समिती अध्यक्ष डॉ.ए.डि.कदम, सदस्य एन.ए.कोळगे, संस्था उपाध्यक्ष शाम पवार, कृ.उ.बा.समिती उपसभापती संजय भोसले (तुळजापुर), संस्था सदस्य बाळासाहेब शिंदे, निरीक्षण गृहाचे अधिक्षिका श्रीमती एम.डी.हरबले, अदि उपस्थित होते. या कार्यक्रमास कर्मचारी, विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपास्थित होते.

 
Top