
भूम/प्रतिनिधी-
भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश, केंद्रीय सतर्कता अभियान भारत सरकार प्रमाणित असणारी संघटना महाराष्ट्र राज्याच्या उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष पदी भूमचे कोहिनुर सय्यद सर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर निवडीचे पत्र संनस्थापक भाऊसाहेब रघुनाथ कांबळे यांनी आपल्या स्वाक्षरीने दिले आहे.सय्यद सर हे सरपंच संघटना मराठवाडा च्या पदावर व शिक्षक संघटनेच्या माध्यमातून विविध विषयाला वाचा फोडली असून अनेकांना न्याय देण्यात त्यांना यश आले आहेत त्यांचे हे कार्य पाहता त्यांना नूतन जबाबदारी देण्यात आली आहे
सोलापूर मध्ये घेण्यात आलेली संघटनेची बैठकी मध्ये निवड करण्यात आली आहे.निवडीचे पत्र देताना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास सातपुते उपाध्यक्ष खतीब साहेब,सरचिटणीस अंबादास शिंदे, सोलापूर जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे,आदी पदाधिकारी उपस्थित होते
कोहिनूर सय्यद यांच्या निवडीने वंचित आघाडीचे युवा नेते प्रवीण रणबागुल यांनी त्यांचा सत्कार केला. प्रसंगी मुकुंद लगाडे ,गवळी ताई,एल टी शिंदे, धीरज शिंदे रवींद्र लोमटे,बाप्पा शिंदे आदी उपस्थित होते.