तुळजापूर/प्रतिनिधी -
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य श्री महेंद्र काका धुरगुडे यांनीअत्यल्प पावसामुळे तालुक्यात दुष्काळ सदृश्य निर्माण झाल्याने दुष्काळ जाहीर करावा या मागणी सह विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्री सावंत यांना दिले
या निवेदनात महेंद्र काका धुरगुडे यांनी असे म्हटले आहे की, उस्मानाबाद राष्ट्रीय महामार्ग -238 रुईभर ते अनसुर्डा हा रस्ता एकुण 6 किमी लांबीचा अतिशय खराब रस्ता दुरुस्त करावा,  रुईभर येथे प्रसिध्द दत्त मंदिर असल्याने मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत दुरुस्त झाल्यास भाविकासाठी सोईचा होणार आहे. तरी हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक /पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत समाविष्ट करून मजबुतीकरण व डांबरीकरण करावे.
उस्मानाबाद तालुक्यातील नितळी ते अंधोरा ता. औसा 3 किमी रस्ता. , सुंभा 4 किमी रस्ता  नितळी ते जायफळ 3 किमी रस्ता  नितळी ते भेटा 2.5 किमी रस्ता हे रस्ते अतिशय खराब झाले असुन  मुख्यमंत्री ग्रामसडक /पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत दुरुस्त करावेत.  या मागणीचे निवेदन ग्रामविकास , महिला व बालविकास मंञी ना. पंकजाताई मुंढे , जिल्हा अधिकारी यांना देण्यात आले.

 
Top