तुळजापूर/प्रतिनिधी-
तालुक्यातील काञी येथील वयोवृध्द शेतकरी राजेंद्र मारुती गोडगिरे (60) हे सोयाबीन पिकातील गवत काढत असताना साप चावल्याने सोलापूर येथील अश्विनी हाँस्पीटल  येथे सोमवार दि.26 रोजी सकाळी दहा वाजता उपचार चालु असताना त्याचा मृत्यू झाला.
या बाबतीत अधिक माहीती अशी की, काञी ता. तुळजापूर येथील शेतकरी राजेंद्र मारुती गोडगिरे यांची काञी शिवारातील गटनंबर 99 व 100 मध्ये शेती आहे. शेतातील सोयाबीन मध्ये वाढलेले गवत काढताना शुक्रवार दि. 23 रोजी दुपारी बारा वाजता साप चावल्यानंतर  त्यांना उस्मानाबाद येथील शासकिय रुग्णालय दाखील करण्यात आले. परंतू त्याची गंभीर परिस्थिती पाहता त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात दाखिल करण्यात आले. परंतू  सोमवारी उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुली ऐक मुलगा असा परिवार आहे त्यांच्या वर सोमवारी सांयकाळी अंत्यविधी करण्यात आले.

 
Top