परंडा /प्रतिनिधी -परंडा तालुक्यातील भर पावसाळ्यात कोरडे ठाक पडलेले सीना- कोळेगांव धरणात कुकडी प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी भाजपाचे प्रदेश सरचणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.
जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचे खाजगी सचिव निशिकांत देशपांडे तसेच कुकडी मंडळाचेअधिक्षक अभियंता धुमाळ, उस्मानाबाद पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता पगार व सोलापूर लाभक्षेत्र मंडळाचे अधिक्षक अभियंता साळे यांच्या बरोबर काॅनफरस मिटींग करून पाणी सोडण्यासंदर्भात चर्चा केली.
सोलापूर येथे लाभक्षेत्र मंडळाचे अधिक्षक अभियंता साळवे,सीना कोळेगाव प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता हरसुरे, सोलापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जगताप यांच्या समवेत बैठक घेतली.तसेच आ.ठाकूर यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी मुधोळ मॅडम, निवासी उपजिल्हाधिकारी खंदारे पुणे येथील जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता राजपूत व अधिक्षक अभियंता पगार तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क करून प्रकल्प आराखड्याची प्रत्यक्ष पाहणी केली.या वेळी आ.ठाकूर यांच्या सोबत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड.संतोष सुर्यवंशी हे उपस्थित होते.
