उस्मानाबाद/प्रतिनिधी~

कोल्हापूर, सांगली, मिरज भागात महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. जीवितहानीबरोबर पशुधनही दगावले असून घरे पाण्याखाली गेल्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन कुटुंबे उघड्यावर आली आहेत. त्यामुळे पूरग्रस्तांना या संकटातून सावरण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून एक कोटी रूपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शनिवारी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 
श्री तुळजा भवानी मंदिर संस्थानचे वार्षिक उत्पन्न 40 ते 50 कोटीपर्यंत आहे. ही रक्कम बँकेत पडून ठेवण्यापेक्षा सामाजिक बांधिलकीचे भान म्हणून पूरग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची मगणी मंदिर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष तथा अध्यक्ष भोपे पुजारी मंडळाचे अमरराजे कदम, मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे, परिवहन विभागचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, मनसे शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बचाटे उपस्थित होते.
 
Top