प्रतिनिधी /उस्मानाबाद-
विधानसभा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर एस. पी. शुगरचे चेअरमन सुरेश पाटील यांनी भाजपचा राजीनामा देत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे.भाजपचे कसबे तडवळ्यातील नेते तथा एस. पी. शुगरचे चेअरमन सुरेश पाटील यांनी उस्मानाबाद-कळंब मतदारसंघामधील १०० गावात भाजप सदस्य नोंदणीच्या माध्यमातून बैठका घेतल्या आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने सुरेश पाटील यांची कोंडी झाली. त्यामुळे पाटील यांनी आमदार राणा पाटील यांच्या भाजप प्रवेशाला उघड विरोध करुन राणा पाटील ज्या दिवशी भाजप प्रवेश करतील त्या दिवशी आपण भाजप सोडू, अशी भूमिका घेतली होती. त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी अपक्ष लढण्याचीही भूमिका जाहीर केली आहे.