लोहारा/प्रतिनिधी-
15 ऑगस्ट 2019 रोजी इस्रो या संस्थेला 50 वर्षे पुर्ण झाल्याचे औचित्य साधून चंद्रयान 2 मोहीमेच्या सर्व स्टेज ची माहीती हायस्कुल लोहारा शाळेतील विध्यार्थी व पालकांना दाखवण्यात आली. हायस्कूल लोहारा प्रशालेतील विद्यार्थ्यांनी चंद्रयान 2 हा विषय घेऊन एक प्रकल्प तयार केला ज्यात इस्रो व चंद्रयान 2 ची संपूर्ण माहितीचे सादरीकरण करण्यात आले.
यामुळे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा व  मोहिम प्रत्यक्ष कशी आहे व हे यान चंद्रावर उतरुन कोणती माहीती जमा करणार आहे, याची सर्व माहिती विद्यार्थी व पालकांना देण्यात आली. प्रकल्पाविषयीची सर्व माहीती मंदार लांडगे व त्याचे सहकारी यांनी सांगितली. त्यांना मार्गदर्शन श्री वसंत राठोड सर, दयानंद पोतदार सर, विठ्ठल वचने सर, श्याम पोतदार सर व विषय शिक्षक सतीश जट्टे सर यांनी केले. या प्रकल्पाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक सुधारक पांचाळ सर व पालक प्रशांत लांडगे, राजशेखर माणिकशेट्टी, मल्लिनाथ फावडे, लक्ष्मण रसाळ, निशिकांत गोरे, आदी पालकांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश जट्टे सर यांनी केले तर आभार दयानंद पोतदार सर यांनी मानले. या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक प्रदुम्न पाटील (देवकर), निर्मला कोळी, गोपाळ सुतार, संजय घोडके, विजय नागणे, गंगाराम पायाळ, सारिका पाटील, शिल्पा साबणे, स्वाती माशाळकर, विनोद लांडगे, वैजनाथ होळकुंदे, वैजनाथ पाटील, दिलीप शिंदे, माधव  हणमशेट्टी, विध्या मक्तेदार, यांच्यासह विद्यार्थी, पालक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top