उस्मानाबाद/प्रतिनिधी-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आदर्श परीक्षा केंद्राचा पुरस्कार येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाला प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांचे वतीने परीक्षा प्रमुख डॉ. डी.वाय. इंगळे, मयुर व्हटकर यांनी कुलुगुरूंच्या हस्ते स्विकारला.
सलग दोन वर्षे मिळाल्याने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देशमुख यांनी विभागातील प्रा. डॉ. डी. वाय. इंगळे, प्रा. हनुमंत साळुंखे,प्रा. डी. एम. शिंदे, मयुर व्हटकर यांचा आज महाविद्यालयात सत्कार केला. यावेळी प्रा. संदिप देशमुख , प्रा. माधव उगीले, प्रा. अतुल देशमुख, डॉ. केशव क्षीरसागर, प्रा. संदिप जाधव, प्रा. राजा जगताप आदी उपस्थित होते.

 
Top