वाशी/प्रतिनिधी-
केंद्र सरकारकडून नव्याने सुरु करण्यात आलेल्या किसान मानधन योजेनचा शुभारंभ शनिवारी (दि.24) करण्यात आला. 18 ते 40 वर्ष वयाच्या व दोन हेक्टरच्या आत क्षेत्र असलेल्या शेतक-यांसाठी वयाच्या 60 पासून पुढे मासिक तीन हजार रुपयांची निवृत्ती वेतन योजना सुरू करण्यात आली आहे.
वाशी येथील आपले सरकार केंद्रात कवडेवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी अंगद वैजिनाथ कवडे यांचा अर्ज भरून त्याचा प्रातिनिधीक शुभारंभ करण्यात आला. एलआयसीच्या धर्तीवर सुरु करण्यात आलेल्या या योजनेमध्ये शेतक-याच्या वयोमानानुसार 55 रुपये ते 200 दोनशे रुपये हे शेतकऱ्याच्या खात्यावरून भरून घेतले जाणार असून जेवढी रक्कम शेतकरी भरणार आहे तेवढीच रक्कम हे सरकार विमा कंपनीला अदा करणार आहे. या निवृत्ती वेतन योजनेमध्ये तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन वयाच्या साठी नंतर निवृत्ती वेतनास पात्र ठरण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच यासाठी शेतक-यांनी आधारकार्ड, बँकेचे पासबुक, 7/12 व 8-अ घेऊन जवळच्या आपले सरकार केंद्रामध्ये नोंदणी करायची आहे. या वेळी महसूल विभागाचे अप्पर आयुक्त हजारे, जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाडगे, तहसीलदार संदीप राजपुरे, तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले, कृषी सहाय्यक दिनेश लोंढे, नवनाथ गिरी, शेतकरी लाभार्थी अंगद कवडे यांच्यासह ग्रामस्थांची याप्रसंगी हे उपस्थिती होती.