तेर/प्रतिनीधी-गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना उस्मानाबाद तालुक्यातील हिंगळजवाडी येथे 8 आँगष्टच्या राञी घडली.
हिंगळजवाडी येथील श्रीक्रष्ण हरी भोसले वय 25 याने मोबाईल आँनलाईन जंगली रमीचा खेळ खेळताना त्यात तोटा झाल्याने मनावर परीनाम व उदास झाल्याने स्वत:च्या घरी पञ्याखालील आडूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.या घटनेबाबत ढोकी पोलिस स्टेशनला आकस्मात म्रत्यू नंबर 42/2019 कलम 174 सीआरपीसी प्रमाणे नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक बी व्ही.वेव्हळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार डी.एन.चव्हाण करीत आहेत.