उस्मानाबाद/प्रतिनिधी- शहरातील सर्व शाळेच्या स्कूल बस व व्हॅन मध्ये समते पेक्षा जास्त प्रमाणात विद्यार्थी संख्या वाहतूक करीत असुन बर्याचशा शाळेच्या स्कूल बसमधील ड्रायव्हर कडे वाहन चालविण्याचा परवाने नसून आसना पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या वाहनामध्ये वाहतुक करत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच अपघात झाल्यास किंवा काही अनुचित प्रकार घडल्यास सर्व जबाबदारी हि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची राहिल याची नोंद घ्यावी सर्व स्कूल बसवर व व्हॅन वर कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले यावेळी परिवहन जिल्हा अध्यक्ष संजय पवार,नितीन राठोड,अविनाश गिरी,सोमनाथ पांढरे,अदी कार्यकर्ते उपस्थित होते..
