संवाददाता । तुलजापूर -
येथील श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने पूरग्रस्तांना पंचवीस लाख रुपये रोख व पंचवीस लाख रुपयाचे जीवनावश्यक वस्तुचे किट देण्यात येणार असुन हे किट मंगळवार दि 12 रोजी राञी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंढे उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, नगराध्यक्ष बापुसाहेब कणे तहसिलदार योगिता कोल्हे यांच्या हस्ते तीन मदत वाहनांचे पुजन करुन ही मदत उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे हे घेवून रवाना झाले.
यावेळी धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले उपस्थितीत होते. सुमारे तेरा लाख रुपयाचे जीवनावश्यक साहित्य त्यात पाच किलो आटा साखर टुथपेस्ट ब्रश साबण दोन किलो तूर, दाळ , तांदुळ यासह अनेक जीवनाश्यक वस्तु व दोन हजार पाणी बाँटल बाँक्स अकराशे साड्या त्यात सहावार नऊवार साड्यांचा समावैश असलेले किट वाहनांतुन पाठवण्यात आले. उर्वरीत मदत लवकर च पाठवली जाणार असल्याची माहीती उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी दिली.