तुळजापूर/प्रतिनिधी- 
येथील तहसिलदार मँडम या  कर्मचा-यांना विनाकारण अर्वाच्य असंविधानिक भाषेत बोलून सर्वासमोर अपमाणीत करीत असुन याचा कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत असल्याची तक्रार तहसिल मधील पंधरा कर्मचा-यांनी जिल्हाधिकारी कडे केल्याने खळबळ उडाली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आह की, तहसिलदार या सर्वा समक्ष छोट्या बाबीवरुन कामासाठी आलेल्या लोकांना राजकिय नेत्यांसमोर  अपमानास्पद वागणूक  देतात व मी बोलते तेच झाले पहिजे अशी भाषा वापरतात.
एखाद्या लिपीक  कर्मचा-यांकडे  जादा काम देवून काम कसे करीत नाहीत बघते अशी भाषा वापरतात कार्यालयीन अडचणी सांगा म्हणतात व सांगितले की कारवाईची भाषा करतात अशा वागणूक मुळे कर्मचारी सतत दडपणा खाली काम करीत असल्याने याचा आमच्या मानसिकतेवर परिणाम झाला असुन याचा आमच्या आरोग्य वर परिणाम होण्याची शक्यता आहे.तरी या प्रकरणाची दखल घेवून सर्व कर्मचा-यांना विश्वासात घेवुन कामाचे योग्य नियोजन करण्यासाठी वरिष्टांनी सहकार्य करावे असे निवेदनात म्हटलं 
 
Top