उस्मानाबाद/प्रतिनिधी-
लोकसंख्येच्या तुलनेत वृक्षाचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे व हे प्रमाण असेच कायम राहिले तर भविष्यात आपला जिल्हा देखील वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष तथा भाजपा नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केले.ते परिवर्तन बहुउद्देशीय शिक्षणसंस्था,शिंगोली यांच्यावतीने वृक्षारोपन व होतकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर कार्यकारी अभियंता सुनिता पाटील  पोलीस निरीक्षक दत्तात्रय सुरवसे, पत्रकार विठ्ठल एडके,शिगोंलीचे सरपंच शहाजी शितोळे,परिवर्तन शिक्षणसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवानंद खूने,बार्शीचे माजी सभापती लक्ष्मण संकपाळ,चंद्रकांत लोहार,भारत केंचे,सतिश तिवारी हे व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.प्रतापसिंह पाटील म्हणाले की,एक व्यक्ती,दहा वृक्ष ही संकल्पना राबविण्याची वेळ आली आहे.केवळ वृक्षारोपन करुन फायदा नाही तर त्याचे संगोपन होणे देखील गरजेचे आहे.राज्यशासन वृक्षलागवड करण्यासाठी वृक्ष देत आहे त्यामुळे याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे ते म्हणाले.यावेळी कार्यकारी अभियंता सुनिता पाटील,पोलीस निरीक्षक दत्तात्रय सुरवसे,शिगोंलीचे सरपंच शहाजी शितोळे यांनी ही वृक्षारोपनाचे महत्व सांगितले तर परिवर्तन शिक्षणसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवानंद खूने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सुत्रसंचलन हर्षवर्धन कांबळे यांनी तर आभार असरार सय्यद हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकनाथ लोहार,संग्राम गवळी,सज्जाद मुलाणी,शांतीलाल कांबळे,तेजस संकपाळ,पोटभरे यांनी परिश्रम घेतले.

 
Top