उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
संतांचा अवतार हा केवळ जगाच्या उध्दारासाठीच झालेला आह़े जगाच्या कल्याणासाठी संताचे कार्य हे प्रेरणादायी आह़े सद्गुरू ब्रम्हचारी रामानंद महाराज यांची महती अपरंपार अशीच आह़े त्यांनी संजीवन समाधी घेवून 100 वर्षे झाल़े तरी त्यांची महती कमी झालेली नाही़ सद्गुरू रामानंद महाराजांनी याठिकाणी समाधी घेणे, हे काजळा गावचे भाग्यच असल्याचे प्रतिपादन हभप नवनाथ महाराज चिखलीकर यांनी केल़े
काजळा येथील श्री रामानंद महाराज यांच्या समाधी शताब्दीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात हभप नवनाथ महाराज चिखलीकर यांचे सोमवारी (दि़12) गुलालाचे कीर्तन झाल़े यावेळी ते बोलत होत़े प्रारंभी सकाळी 6 वाजता सद्गुरू रामानंद महाराज यांच्या समाधीस महाअभिषेक करून महाआरती करण्यात आली़ त्यानंतर मंदिरापासून पालखी मिरवणुकीस मंगलमय, भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला़ मिरवणुकीत बालगोपाळ वारकख्रयांची वेशभूषा परिधान करून सहभागी झाले तर महिलांनी डोक्यावर कलश घेवून उस्फूर्तपणे मिरवणुकीत सहभाग घेतला़ त्यानंतर दुपारी हभप नवनाथ महाराज यांचे सुश्राव्य असे गुलालाचे कीर्तन झाल़े. यावेळी महाराज म्हणाले, सद्गुरू ब्रम्हचारी रामानंद महाराज यांचा अवतार हा संतरूपीच होता़ महाराजांनी आयुष्यभर भक्ताच्या उध्दारासाठीच आयुष्य वेचल़े महाबळेश्वर अर्थात दक्षिण महाराष्ट्रात महाराजांनी अनेक वर्ष उपासना केली़ त्यानंतर महाराज काजळा नगरीत आल़े याठिकाणीच ते राहिले आणि संजीवन समाधी घेवून त्यांनी भक्तांचा अखेरचा निरोप घेतला़ या घटनेला आज 100 वर्ष झाली आहेत़ रामानंद महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य भक्ताच्या उध्दारासाठी घातल़े काजळासह परिसरात आजही महाराजांचा सहवास दरवळत असल्याचेही हभप नवनाथ महाराज चिखलीकर यांनी सांगितल़े यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, मीडिया जिल्हाप्रमुख धनंजय रणदिवे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, अॅड़ व्यंकट गुंड, जि़प़ सदस्य ज्ञानदेव राजगुरू, अॅड़ नितीन भोसले, अॅड. चौरे, दत्तात्रय सोनटक्के, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप शिंदे, डॉ़ दिग्गज दापके-देशमुख, सारोळा सरपंच प्रशांत रणदिवे, काजळ्याचे सरपंच शशिकला शिंदे, उपसरपंच अॅड़ विजयदत्त पाटील, हभम राम महाराज सुतार, नवनाथ महाराज सुतार, संस्थानचे अध्यक्ष प्रदीप शेळके, कार्याध्यक्ष उमेश पवार, सचिव किशोर मसे, ढवण, गजानन देशपांडे, औदुंबर पाटील, अरविंद माळी, दत्तात्रय माळी, राजेश हाजगुडे, अण्णा मडके, अंगदराव मसे, राजुळ पवार, हरिभाऊ शिंदे, पांडूरंग खोचरे, नवनाथ शिंदे, हरिहर पराग महाराज आदींसह भाविकांनी अलोट गर्दी केली होती़
भव्य पालखी मिरवणूक
सकाळी मंदिरापासून पालखी मिरवणूक निघाली़ रामानंद महाराजांची मूर्ती फुलांनी सजवलेल्या रथात ठेवण्यात आली होती़ लाकडी पालखी आणि त्यावर कोरलेले आकर्षक नक्षीकाम शोभून दिसत होत़े तर महाराजांची मूर्ती पाहून भाविक धन्य-धन्य झाल़े टाळ-मृदंगाचा गजर आणि मुखी हरिनामाच्या गजराने अवघी काजळा नगरी भक्तीरसात ओली चिंब झाल्याचे दिसून आल़े
सभामंडपासाठी 15 लाखाचा निधी देणार-आ़ ठाकूर
सप्ताहास भाजपाचे प्रदेश सरचिटणीस, आ़ सुजितसिंह ठाकूर यांनी उपस्थित राहून रामानंद महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतल़े त्यानंतर मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला़ यावेळी आ़ ठाकूर यांनी भाविकांची मागणी लक्षात घेवून मंदिरासमोरील खुल्या जागेत सभागृह बांधकामासाठी 15 लाख रूपयांचा निधी देण्याची घोषणा केली़ तसेच मंगळवारी दुपारी निधी मंजुरीचे पत्र संस्थानच्या पदाधिकाख्रयांच्या हातात मिळेल, तीर्थक्षेत्राचा वाढीव दर्जा मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासनही आ़. ठाकूर यांनी दिल़े