भूम/प्रतिनिधी-
कै. मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांची पुण्यतिथी सेवादल काँग्रेसच्या वतीने व सर्व राजकीय पक्षाच्या नेत्याच्या उपस्थिती मध्ये साजरी करण्यात आली. प्रारंभी भूम पंचात समितीच्या प्रांगणात कै. विलासराव देशमुख यांना अभिवादन करण्यात आले.
यावेही सेवादल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास शाळू , माजी नगराध्यक्ष विजयसिंह थोरात, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष आदमभाई शेख,  शिवसेनेचे दिलीप शाळु, भाजप शहर प्रमुख संतोष सुपेकर, शिक्षण महर्षी आर.डी. सुळ सर, राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत पाटुळे, भाऊसाहेब चोरमले, आर पी आयचे मराठवाडा उपाध्यक्ष भागवत शिंदे, माजी नगरसेवक रुपेशआप्पा शेंडगे, मोईज सय्यद, रामचंद्र शेळके, महमंद पटेल, इकबाल पठाण, आशोक टिपे,  ताहेरभाई शेख शेकापूरकर, अॅड. शिराज मोगल, राजेंद्र  गाढवे, श्रीहरी दंवडे, प्रभाकार डोंबाळे , गौसभाई शेख, अशोक नलवडे,  राजेंद्र  विर, रामदास पाटील,शिवसेना माजी शहर प्रमुख दीपक मुळे, रमेश मस्कर यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थीत होते. यावेळी कॉग्रेसचे  विलास शाळु यांनी सर्व पक्षीय नेत्याचे आभार मानले.
 
Top