उमरगा/प्रतिनिधी-
 देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी भारताच्या राजकीय  इतिहासातील ऐतिहासिक निर्णय घेवुन जम्मु-काश्मिर येथील कलम 370 व 35 अ रद्द केल्याबध्दल  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उमरगा शहराच्या वतिने शहरातील शिवाजी चौक येथे छत्रपती महाराजांना पुष्पहार घालुन, फटाके वाजवून, साखर वाटुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शुभम मुळजकर, प्रसन्ना पुदाले, साई टाचले, निखील कुलकर्णी, सुशीलकुमार शिंदे, विशाल नारायनकर, ओम जगताप, सुरज आबाचणे, अदि उपस्थित होते.

 
Top