परंडा /प्रतिनिधी:- विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये कोणतीही अपेक्षा न ठेवता सहभागी होऊन स्पर्धेमध्ये यश संपादन करावे बक्षीस मिळेल त्यासाठी खेळणे किंवा स्पर्धेमध्ये भाग घेणे हा उद्देश न ठेवता विद्यार्थ्यांनी कोणत्याही स्पर्धेमध्ये सहभागी झाच्यास आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतील असे प्रतिपादन शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दिपा सावळे यांनी महाविद्यालयांमध्ये आयोजित केलेल्या नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने देशभक्ती एवम राष्ट्रनिर्माण या तालुकास्तरीय भाषण स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना शुभेच्छापर मार्गदर्शन करताना वरील वक्तव्य केले यावेळी व्यासपीठावर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ शहाजी चंदनशिवे नेहरू युवा केंद्राचे तालुका समन्वयक रणजीत पाटील व रामेश्वर चोबे अक्षय बोर्डे तसेच या भाषण स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा सचिन साबळे डॉ.शहाजी चंदनशिवे व प्रा.सौ. सूर्यवंशी एन.बी.उपस्थित होते यावेळी कला वाणिज्य व विज्ञान विभागातील एकूण 14 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता परीक्षकांच्या परीक्षा नंतर सर्व विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मार्गदर्शन करण्यात आले रणजीत पाटील रामेश्वर चौबे सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले तर आभार रणजीत पाटील यांनी मानले.यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान विभागातील विद्यार्थी विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.
