तुळजापूर/प्रतिनिधी-
आगामी विधानसभा निवडणूक पाश्र्वभूमीवर तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवारांनी गावभेट, संवाद दौरे सुरु केले आहे. परंतू  सध्या तरी भाजपा-शिवसेना युतीवर बहुतांशी इच्छुक उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असल्याने इच्छुक उमेदवारा पैकी कोणाला उमेदवारी मिळणार हे असून गुलदस्त्यात आहे.
त्यामुळे कोण कुठल्या राजकिय पक्षातुन लढणार याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 25 आँगस्ट 1019 रोजी महाजनादेश याञा माध्यमातून तालुका  दौ-यावर येत असुन त्यानंतरच लढतीचे चिञ काही अंशी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
सध्या उमेदवार मिळवण्यासाठी सर्वाधिक चुरस भाजपा मध्ये आहे. शिवसेनेकडून ही लढण्या-या इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे .कांँग्रेस पक्षाकडून विद्यमान आ. मधुकर चव्हाण, माजी जि. प अध्यक्ष अँड धीरज कदम पाटील यांनी उमेदवारीची पक्षकडे मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  माञ उमेदवारी  मागणीची अपेक्षित हालचाली दिसुन येत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जि.प सदस्य महेंद्र धुरगुडे  इच्छुक आहेत. तर अशोक जगदाळे  यांनी मिळेल त्या पक्षाकडून निवडणूक लढविण्याचा चंग बांधला आहे.
सध्या युतीच्या जागे  बाबतीत निर्णय झाला नसल्याची चर्चा आहे. सध्या तरी इच्छुक उमेदवार पक्ष या बाबतीत संभ्रमावस्थेचे वातावरण तयार झाले असुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्वाधिक संभ्रमावस्थेचे  वातावरण आहे. कश्मीर मधील 370 कलम रद्दची मोठी चर्चा मतदारात होत असुन हा मुद्दा शिवसेना-भाजपाला लाभदायक व कांँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला तापदायक ठरण्याची मोठी शक्यता आहे. आता इच्छुक उमेदवारांनी विकास कामांचे उद्घाटने मतदारांना देवदर्शन घडवणे, घरोघरी मतदारांचा जावून भेटीगाठी  घेण्याचा सपाटा लावल्याने सध्या मतदारांना  चांगले दिवस  आले असुन त्याला ख-या  अर्थाने  राजाचे दिवस आल्याचे चित्र दिसत आहे.
 
Top