उस्मानाबाद/प्रतिनिधी-
भारतीय जनता पार्टी तर्फे आयोजित महाजानादेश यात्रेच्या दुसर्या टप्प्याची सुरवात दि. 21 ऑगस्ट रोजी नंदूरबार येथून होत आहे. ही यात्रा दि. 31 ऑगस्ट रोजी उस्मानाबाद शहरात येत आहे.या निमिताने उस्मानाबाद शहरात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भव्य अशी जाहीर सभा होणार आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी भारतीय जनता पार्टीची बैठक भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या अध्यक्षते खाली दि. 22 ऑगस्ट रोजी समर्थ हॉल,कोर्टच्या मागे दुपारी 2  वाजता होणार आहे.
 या बैठकीसाठी प्र.का.सदस्य अँड. मिलिंद पाटील, अँड. नितीन काळे, अँड. खंडेराव चौरे,   सुधीर पाटील अँड. व्यंकटराव गुंड, अँड. राम गरड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी या बैठकीसाठी शहरातील सर्व पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी, कार्यकत्र्यां यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शहराध्यक्ष संदीप कोकाटे यांनी केले आहे.

 
Top