उस्मानाबाद/प्रतिनिधी-
क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याची मान उंचावण्याची कामगिरी केलेल्या खेळाडूंसह त्यांचे  मार्गदर्शक व विविध जिल्हा क्रीडा संघटनांच्या कार्याची दखल घेत क्रीडाभारती उस्मानाबाद जिल्हा शाखेच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त गुरूवार, २९ ऑगस्ट रोजी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 
क्रीडाभारती उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणीच्या ग्रीनलँड स्कुलमध्ये  जिल्हाध्यक्ष लक्ष्मी स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शक मन्मथप्पा पाळणे, गणेश जळके, उपाध्यक्ष रामकृष्ण खडके, मोहन पाटील, जिल्हा मंत्री प्रवीण गडदे, सहमंत्री अभय वाघोलीकर, जिल्हा संघटक बालाजी कानडे, प्रभाकर जाधव, योग व प्राणायाम प्रमुख योगेश उपळकर, जिल्हा युवक प्रमुख कुलदीप सावंत, प्रसिद्धी प्रमुख प्रशांत कावरे, कैलास लांडगे, प्रज्योत कावरे आदींसह पदाधिकारी, सदस्यांची उपस्थिती होती.
हॉकीचे जादूगार म्हणून ओळख असलेले मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून क्रीडा भारती उस्मानाबाद शाखेच्या वतीने जिल्ह्यातील राज्य, राष्ट्रीय खेळाडू, विविध क्रीडा मार्गदर्शक, विविध एकविध जिल्हा क्रीडा संघटनेचे अध्यक्ष, सचिव यांना गुरूवार, २९ ऑगस्ट रोजी उस्मानाबाद शहरातील श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलावर सायंकाळी पाच वाजता गौरविण्यात येणार आहे. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी जिल्हा युवक प्रमुख कुलदीप सावंत (९४२२६६२९८३), कैलास लांडगे (९९२२५५४६५२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन क्रीडाभारती उस्मानाबादच्या वतीने जिल्हाध्यक्ष लक्ष्मी स्वामी, जिल्हा मंत्री प्रवीण गडदे, प्रसिद्धी प्रमुख प्रशांत कावरे यांनी केले आहे.
 
Top