प्रतिनिधी /उस्मानाबाद-
बदलत्या काळात पत्रकारांसमोर मोठी आव्हाने आहेत. एखादी बातमी छापली तर ज्याच्याविरोधात बातमी आहे. ती व्यक्ती नाराज होते. दुसरीकडे बातमी नाही लागली तर पत्रकारांच्या विश्वासाहर्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. अशाही परिस्थितीत सदरची आव्हाने पेलून पत्रकारीतेमध्ये नवनवीन प्रयोग होत आहेत ही सकारात्मक बाब असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी केले.
उस्मानाबाद येथे जिल्हा पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा रविवारी (दि.25) शहरातील विविध संघटना, मित्रमंडळीच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नानासाहेब पाटील बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, सेक्रेटरी भीमाशंकर वाघमारे, मावळते अध्यक्ष महेश पोतदार, नूतन उपाध्यक्ष सयाजी शेळके, सहसचिव तानाजी जाधवर, कोषाध्यक्ष जी. बी.राजपूत, मार्गदर्शक कमलाकर कुलकर्णी, दिलिप पाठक-नारीकर, रवींद्र केसकर, प्रवक्ता बालाजी निरफळ, कार्यकारणी सदस्य कालिदास म्हेत्रे, प्रवीण पवार, बाबुराव चव्हाण, बाळासाहेब माने, आरिफ शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्वप्रथम जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष देविदास पाठक यांच्या मातोश्रीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले असल्याने सर्वांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम विविध संघटना, मित्रपरिवाराच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचा संयुक्त सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष चंद्रसेन देशमुख यांनी पत्रकारांसमोरील अडचणी सोडविण्याबरोबरच त्यांच्या कौटुंबिक पातळीवरील समस्यांचेही निराकरण करण्यासाठी पत्रकार संघ काम करेल असे सांगत येत्या काळात सदस्य पत्रकारांचा विमा काढणे, त्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी पाठपुरावा करणे आदी उपक्रमाबरोबरच शहरात विविध उपक्रमांद्वारे पथदर्शी कार्य करण्याचा मानस बोलून दाखविला. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, जनता बँकेचे माजी अध्यक्ष विश्वास शिंदे यांनीही कार्यक्रमास हजेरी लाऊन नूतन पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. याप्रसंगी मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने नितीन तावडे, माधव गरड यांनी, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री, बंटी जाधव, क्लीन समता-ग्रीन समता परिवाराचे नाना घाडगे, स्वातंत्र्य सैनिक समितीचे भास्करराव नायगावकर, शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे विष्णू इंगळे, एकता फाऊंडेशनचे अभिलाष लोमटे, सिटी समर्थ बिल्डर्सचे धीरज मोटे, धीरज गायकवाड, फूक संघटनेचे धर्मवीर कदम, एकल शिक्षक सेवा मंचचे पवन सूर्यवंशी, टू व्हीलर मेकॅनिकल संघटनेचे बाबा साळुंके,आपली माणसं मित्र परिवारचे खंडु राऊत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दादा कांबळे, युवा आधार प्रतिष्ठाणचे राजसिंहा राजेनिंबाळकर, अग्निवेश शिंदे, हिंमत भोसले, सूर्या फाऊंडेशनचे संकेत सूर्यवंशी, अभिजीत देशमुख, अमोल देशमुख, शिवाजी दहिहांडे, बागल, उमेशराजे निंबाळकर, उमेश घायाळ, वैभव गरड, रोहित थिटे, नगरसेवक सोमनाथ गुरव, नगरसेवक बाळासाहेब काकडे, नगरसेवक अभिजित काकडे, अक्षय ढोबळे, पल्लू काकडे, विठ्ठल कदम, मनोज डोलारे, संदीप साळुंके, संदीप इंगळे, जयंत देशमुख, आबा निंबाळकर, विवेक कापसे यांच्यासह शहरातील विविध संस्था, संघटना, गणेश मंडळ तसेच मित्र परिवाराच्यावतीने नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या सोहळ्याचे सूत्रसंचलन संंस्कृती प्रतिष्ठाणचे प्रदीप गोरे यांनी केले.
 
Top