प्रतिनिधी / उस्मानाबाद-
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना उस्मानाबाद येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जिल्हा कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी पुष्प अर्पण केले. त्यांच्या कार्याची माहिती धनजंय रणदिवे, डॉ. प्रतापसिंह पाटील, राहुल काकडे, पांडुरंग पवार यांनी दिली. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हा चिटणीस वृषाली वरुडकर, युवती प्रमुख पूजा देडे, सोशल मीडियासह संयोजक अजित काकडे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस राहुल काकडे, नगरसेवक बालाजी कोरे, दाजीप्पा पवार,श्रीकांत सानप, उस्मानाबाद, कळंब विधानसभा मतदार संघ विस्तारक मकरंद पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते अरविंद कदम, मुकुंद शेळके, महेंद्र बिदरकर, अरविंद रगडे, ब्रम्हदेव उपासे आदी उपस्थित होते.
