तुळजापूर/प्रतिनिधी-
 भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचीत्य साधुन येथील कुतवळ मल्टीस्पेशालिटी हाँस्पीटलच्या वतीने तुळजापूर येथे पंधरा व सोळा व लोहारा येथे सतरा आँगस्ट 2019 रोजी  मोफत नेञरोग  तपासणी शिबीर व लेसर शस्त्रक्रिया मशीन व रेटीना कँमेरा उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे.
डॉ. कुतवळ हाँस्पीटल येथे नव्याने दाखल झालेल्या या मशीन व कॅमे-याचे उद्घाटन डॉ. नरसिंग मलबा व डॉ. सुरेंद्र पेशवे  यांच्या हस्ते सकाळी 11 वा. नळदुर्ग रोड कुतवळ हाँस्पीटल येथे करण्यात येणार आहे .
तुळजापूर येथे पंधरा व सोळा आँगस्ट रोजी  व लोहारा येथे सतरा आँगस्ट 2019 रोजी सामाजिक उपक्रम अंतर्गत डॉ. कुतवळ हाँस्पीटल च्या वतीने आयोजित केला. ज्याना या शीबीराचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी डॉ. कुतवळ हाँस्पीटल येथे पुर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. तरी याचा लाभ घेण्याचे आवाहन डाँ.कुतवळ मल्टीस्पेशालिटी हाँस्पीटलचे प्रमुख डाँ. कुतवळ यांनी केले आहे.
 
Top