नळदुर्ग /प्रतिनिधी-
 नळदुर्ग पालिकेने शिवनेरी तरुण मंडळाला तात्काळ गणेशोत्सवापर्यंत सभागृह बांधुन दयावे यावे मागणीसाठी शिवनेरी तरुण मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालिकेसमोर मंगळवार दि.13 पासून बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे. दरम्यान त्यांच्या मागणीनुसार पालिकेकडून लेखी आश्वासन मिळत नसल्याने मुख्याधिकारी यांनी दिलेले पत्र उपोषण कर्त्यांनी नाकारले त्यामुळे सायंकाळी चार वाजेपर्यंत हे उपोषण मिटले नाही.
नळदुर्ग येथील शिवनेरी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांची गेल्या अनेक वर्षापासून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सभागृह बांधून दयावे अशी पालिकेकडे मागणी होत होती. दरम्यान पालिकेने ज्या ठिकाणी गणेश मुर्ती बसविली जायची त्या ठिकाणी सभागृह मंजूर करुन प्रत्यक्ष सभागृहाच्या कामास सुरुवात केली होती. दरम्यान त्या ठिकाणी वैयक्तीक मालकीची जागा आसल्याचे कारण पुढे करुन एका व्यक्तीने त्या ठिकाणी न्यायालयाचा तात्पुरता मनाई हूकम आणला होता, तो मनाई हूकम हा 13 ऑगष्ट पर्यंत होता. दरम्यान पालिकेने सभागृह मंजूर करुन त्या ठिकाणी बांधकास सुरुवात केल्यानंतर पुन्हा पालिकेने ते बांधकाम थांबविल्यामुळे शिवनेरी तरुण मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पालिकेसमोर दि. 13 ऑगष्ट पासून बेमुदम उपोषण सुरु केले आहे. आम्हाला सभागृह बांधून दयावे हीच आमची मागणी असून सभागृह बांधकामाचे जो पर्यंत लेखी पत्र पालिके कडून मिळत नाही तो पर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा उपोषण कर्त्यांनी घेतला आसल्यामुळे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांचा या वेळी नाईलाज झाला असून हे उपोषण मागे घेण्यात आले नाही. दरम्यान आज सायंकाळी चार वाजे पर्यंत हे उपोषण तसेच चालू होते.
पालिकेचे मुख्याधिकारी हे  नवीन असून पंधरा दिवसापूर्वी पालिकेत ते प्रशासनाची सुत्रे स्वीकारली आहेत . त्यामुळे त्यांच्या विनंतीस मान देवून यावरती दोन्ही पार्टीला समोर घेवून त्यांचे दस्तएैवज पाहून पुढील निर्णय घेई पर्यंत उपोषण मागे घ्यावे अशी लेखी विंनती मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांनी केली होती परंतु जो पर्यंत आम्हाला सभागृह बांधकामाचे लेखी आदेश मिळत नाही तो पर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही असे उपोषण कर्त्यांनी सांगितल्यामुळे हा पेच आणखीन वाढला आहे. दरम्यान या उपोषणामध्ये शिवनेरी  तरुण मंडळाचे सुनिल चौधरी, शिवाजी धुमाळ, श्री मुळे, महादेव सुरवसे, बाळू शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी उपोषणास बसले आहेत.
 
Top