कळंब/प्रतिनिधी-जिल्हयातील खासगी प्राथमिक व माध्यमिक संस्थेतील शिक्षकांच्या परिभाषित अंशदायी पेन्शन योजनेंतर्गत कपात करण्याात आलेल्या रक्कमांचा हिशोब पुढील एक महिन्याच्या  आत देण्यात यावा अन्यथा 21 सप्टेंबर 2019 रोजी आपल्या कार्यालयासमोर एक दिवसाचे भव्य? धरणे आंदोलन करण्यात येईल,असा इशारा जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने प्राथमिक व माध्यमिकच्या वेतन अधिकांना निवेदनाव्दारे देण्यात आला.
संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,खासगी संस्थेत कार्यरत असणा-या शिक्षकांच्या अंशदायी पेन्शन योजनेंतर्गत कपात करण्यात आलेल्या रक्कमांचा हिशोब देण्यात यावा,यासाठी संघटनेने वारंवार निवेदने देऊनही तसेच सातत्या ने पाठपुरावा करूनही अद्यापपर्यंत आपल्या कार्यालयाकडून संबंधितांना त्यांच्या कपातीचा कसलाही हिशोब देण्यात आलेला नाही. तरी संबंधितांचा कपात सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंतचा हिशोब पुढील एक महिन्यााच्या आत देण्यात यावा ,अन्यथा 21 सप्टेंबर 2019 रोजी कार्यालयासमोर एक दिवसाचे भव्य आंदोलन करण्यात येईल.असा इशारा प्राथमिक व माध्यमिकच्या वेतन अधिक्षकांना संघटनच्या वतीने निवेदनाव्दारे देण्याात आला.
निवेदनावर तालुकाध्यक्ष नारायण बाकले,सरचिटणीस मोहन सोनटक्के, मुक्ता ढासाळकर,जिल्हा मुख्य. संघटक प्रशांत घुटे,कार्याध्यक्ष सुनिल बोरकर,कोषाध्यक्ष दशरथ नथाडे,तालुका उपाध्यक्ष हनुमंत घाडगे,म.संघटक अलका अडसूळ,जिल्हा  कार्यकारणी सदस्य  दत्ता टारपे,प्रसिध्दी प्रमुख सचिन भांडे,खासगी संस्था प्रतिनिधी किरण खरडकर,केंद्र संघटक अनिल शिंदे,महादेव मेनकुदळे,राम,शेळके,अविनाश पवार,माधव बोधले,रमाकांत दिक्षीत,अशोक आंधळे,अ.बा.खोचरे,र.सु.बेद्रे,अ.न.मडके,माळी आर.बी.साळुंके यु.डी.कोळी बी.एन.सुरेश निरफळ,गणेश अंबाड,सतिश भोयटे,अविनाश खरडकर,सुधाकर सुरवसे,प्रमोद लामतुरे,अं.खोकले,खुडे के.जी.व्ही,. व्ही,.राऊत,पस्तापुरे बी.एच. आदी शिक्षकांच्या स्वाक्ष-या आहेत.

 
Top