परंडा / प्रतिनिधी -
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ,परंडा संचलित ग्लोबल इंग्लिश स्कुल, ग्लोबल विद्यालय , ग्लोबल ज्युनिअर कॉलेज मध्ये एक मुलगी एक झाड उपक्रम राबविण्याला आला.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोरख मोरजकर हे अध्यक्षीय स्थानी विराजमान होते व प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग मुसळे , संस्थेच्या सचिव सौ.आशा मोरजकर, सुलोचना मुसळे व गणेश मुसळे यांची उपस्थित होती. हा उपक्रम विद्यार्थीनी दुर्वा गणेश मुसळे हिच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आला. या उपक्रमाची सुरूवात केक कापून व तिला तिच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देऊन करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत गणेश आप्पा मुसळे यांनी 25 झाडे शाळेला भेट म्हणून दिली. या उपक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे झाडांची मोठया प्रमाणावर तोड झाल्यामुळे त्यांचा हवामानावर होणारा परिणाम म्हणजे पावसाचे कमी झालेले प्रमाण,वाढती उष्णता , तापमानात झालेली वाढ त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी झपाटयाने कमी होत आहे.यावर उपाय म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत मुसळे परिवाराने भेट दिलेल्या झाडांचे वृक्षारोपण विद्यार्थीनी दुर्वा मुसळे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी अमोल भिसे, नारायण मुळीक , सचिन मुसळे, धनंजय चोरमले, भरत ननवरे, सचिन भराटे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .