भूम/प्रतिनिधी-
कृषी विभाग मार्फत तूर,सोयाबीन, उडीद आदी पिकांवर येणारी कीड अथवा आळ्या आदी पासून पिकांचे संरक्षण कसे करावी अशी गाव निहाय शेती शाळा राबवली जात आहे.
क्रॉपसॅप योजनेअंतर्गत मौजे अंतरवली तालुका भूम येथे सोयाबीन पिकातील शेतीशाळा घेण्यात आली. सदर शेती शाळेमध्ये सोयाबीन पिकांमधील लष्करी अळी नियंत्रणासाठी कोणते उपाय व औषधी वापरावी याचे मार्गदर्शन करण्यात आले. सोयाबीनसाठी कामगंध सापळे व त्याआधारे इमामेक्टीन बेंझोटे चार ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी मिश्रण करून याची फवारणी करायची शिफारस करण्यात आली तसेच दुष्काळी परिस्थितीत असल्याने सोयाबीनमध्ये 13.00. 45 याची फवारणी चे शिफारस करण्यात आली.
शेतीशाळेत प्रमुख मार्गदर्शन कृषी सहाय्यक पी. एम चंदनशिवे, कृषी पर्यवेक्षक जे. डी भोसले व मंडळ कृषी अधिकारी एन. पी रायकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच गावातील सरपंच संतोष ठोंबरे, काकासाहेब डोके, दाऊत शेख, शिकातोड, पवार, गव्हाणे, इस्माईल सय्यद आदी गावातील प्रगतशील शेतकरी सहभागी होते.