वाशी /प्रतिनिधी-
तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना वाशी उपतालुका प्रमुख विकास तळेकर त्यांच्या लेटरहेडवर वाशी तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन पारगाव सर्कल मधील सर्व गावे टोलमुक्त करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशा-याचे लेखी निवेदन देण्यात आले.
निवेदनावर म्हटले आहे की, बीड सोलापूर महामार्ग पारगाव येथे टोलनाका आहे. प्रत्येक वाहनांना 30 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत टोल आहे. पारगाव परिसरामधील वाहनधारकांना गावातून बाहेर निघाले की लगेच टोल द्यावा लागतो. त्यामुळे खाजगी प्रवासी वाहतूक करणारे तसेच शासकीय कामासाठी तालुक्याला जाणा-या वाहनधारकांची लूट होत आहे. त्यामुळे पारगाव सह टोलनाक्यापासून दहा किलोमीटर आंतर असलेल्या गावांना टोलमुक्त करावे,अन्यथा शिवसेनेच्या वतीने दिनांक 13/09/2019 रोजी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी टोल व्यवस्थापक वर राहील,असे या निवेदनावर लिहिले आहे. वाशी चे तहसीलदार संदीप राजपुरे यांना निवेदन देतांना शिवसेना वाशी उपतालुकाप्रमुख विकास तळेकर, तानाजी कोकाटे, फुलचंद बाराते,संतोष लाड, तसेच इतर शिवसैनिक उपस्थित होते.