लोहारा/प्रतिनिधी-ऐतिहासिक महाजनादेश यात्रेला हजारोंच्या संख्येने सामील व्हा, असे अवाहान भाजपा मिडिया विभाग जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी केले. राज्याचे लोकप्रिय यशस्वी मुख्यमंत्री ना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या जनजागरण रथाचे लोहारा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी दि.28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता फटाक्यांच्या आतिषबाजीत मान्यवरांच्या हस्ते जंगी स्वागत करुन रथाचे पुजन करण्यात आले.भारतीय जनता पार्टी मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली या महाजनादेश यात्रेच्या रथाचे उस्मानाबाद जिल्ह्यातील गाव, वाडी, वस्ती, तांड्यासह तालुक्याच्या ठिकाणी जाऊन दि.1 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद येथे दुपारी 2 वाजता जाहीर सभा होणार असून तर तुळजापूर येथे दुपारी 4 वाजता होणाऱ्या संवाद सभेचे आयोजन करण्यात आले असून या महाजनादेश यात्रेची माहिती भारतीय जनता पार्टी मीडिया विभागाच्या वतीने जनजागरण रथाच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येत असून हे रथ लोहारा शहरात दाखल होताच भारतीय जनता पार्टी, भाजयुमो, भाजप मीडिया विभाग व नागरिकांच्या वतीने फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जनजागरण रथाला पुष्पहार घालून नारळ फोडून उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख म्हणुन भारतीय जनता पार्टी मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे, भाजप विस्तारक शिवाजीराव गिडे, भाजपा मिडिया विभाग तालुकाध्यक्ष तथा सह नोंदणी प्रमुख इकबाल मुल्ला, कृषी उत्पन्न बाजार समितीचे तज्ञ संचालक हाजी बाबा शेख, बहादूर मोमीन, भाजपा माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, पत्रकार पार्श्वनाथ बाळापुरे, भाजयुमो जिल्हा चिटणीस नेताजी शिंदे, शहराध्यक्ष अशोक तिगाडे, रिपाई रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष उत्तम भालेराव, संजय माने, अशोक दुबे, असलम आत्तार, प्रशांत काळे, गोविंद सुर्यवंशी, कल्याण ढगे, मंगेश महाजन, शंकर सुतार, श्री. गवळी, अदि उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पार्टी मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे हे मार्गदर्शन करताना म्हणाले की, राज्य सरकारच्या विकासात्मक कामाचा लेखा जोखा मांडण्यासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधण्यासाठी दि.1 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद येथे जाहीर सभेला तर तुळजापूर येथे संवाद सभेला उपस्थित राहणार आहेत. तरी लोहारा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, व नागरिकांनी हजारोंच्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन भाजप मिडिया जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी यावेळी केले. यावेळी विस्तारक शिवाजीराव गिड्डे, भाजपा मिडिया विभाग तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, हाजी बाबा शेख, अदिंनी मार्गदर्शन केले. यावेळी सुत्रसंचालन विस्तारक शिवाजीराव गिड्डे यांनी केले तर आभार माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार यांनी मानले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.