परंडा /प्रतिनिधी-
रा.गे शिंदे महाविद्यालयात शालेय शिक्षण विभाग व जिल्हा क्रक्रीडा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अनुक्रमे रा.गे.शिंदे महाविद्यालयाची कु.मांजरे राजश्री प्रथम, आणि कु.सरवदे कांचन द्वितीय तर शेरे सोनाली  ही तृतीय क्रमांकाने विजयी झाली.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग आणि जिल्हा क्रक्रीडा विभाग यांच्या वतीने युवा जागर- महाराष्ट्रावर बोलू काही या उपक्रमाअंतर्गत या तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दिपा सावळे सांस्कृतिक विभागाचे प्रा. संभाजी धनवे,प्रा. मुळीक दत्तात्रय, श्री.हाके ग.शि.कार्यालय सौ.जगताप डी.एम.,प्रा.हुके दिपक,प्रा.शिवशंकर अंकुश उपस्थित होते. तालुक्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघांनी यात सहभाग नोंदवला होता.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.संभाजी धनवे यांनी केले. अध्यक्षीय समारोप प्राचार्या डॉ. दिपा सावळे मॅडम यांनी केला. आभार प्रदर्शन प्रा. शिवशंकर अंकुश यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. हुके दिपक यांनी केले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. संभाजी धनव, हाके साहेब व सौ.जगताप मनिषा  यांनी काम पाहीले.
 
Top