प्रतिनिधी/तुळजापुर-शहरातील राजे संभाजी तरुण मंडळाने सामाजिक बांधिलकीतून एका युवकाच्या उपचारासाठी ७५ हजार रुपयांची मदत केली आहे. उपचारासाठी अन्य व्यक्तींनीही पुढाकार घेण्याची गरज आहे. 
शहरातील खटकाळ गल्ली येथील नितेश चंद्रकांत कांबळे या युवकाची मूत्रपिंड (किडनी) खराब झाल्यामुळे उपचाराला १० लाख रुपये खर्च येत आहे. नितेशची अर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने उपचारासाठी अर्थिक अडचण येत आहे. राजे संभाजी तरुण मंडळाने सामाजिक ७५ हजारांची अर्थिक मदत केली. यावेळी नगराध्यक्ष चंद्रकांत बापू कणे, माजी नगरसेवक विनोद गंगणे, विशाल छत्रे, राम छत्रे, विश्वनाथ काचोळे, सागर जगदाळे, अतुल दळवी, ननू साठे, प्रशांत कंकाळ, लहु कांबळे, नंदकुमार डाके, मोहन मोगरकर, अंकुश हाके आदींची उपस्थिती होती. 

 
Top