तुळजापूर/प्रतिनिधी
येथील कृषी विज्ञान केंद्र परिसरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत विना अनुदानित कृषी तंत्र विद्यालय सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून बंद करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे पालकांसह विद्याथ्र्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ग्रामीण भागातील शेतक-यांच्या मुलांची शिक्षणाची सोय व्हावी, म्हणून हे कृषी विद्यालय चालू करण्यात आले होते. याठिकाणी शिक्षण घेवून शेतकरी पुत्रांना ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी आदी पदावर नोकरी मिळण्याची आशा होती. मात्र विद्यालय बंद करण्याच्या निर्णयाने आता दुसरीकडे जावून शिक्षण घ्यावे लागणार आहे. उस्मानाबाद जिल्हयात खासगी कृषी विद्यालये मोठया प्रमाणात आहेत. मात्र तुळजापूरचे एकमेव विना अनुदानित कृषी विद्यापीठाचे कृषी विद्यालय होते. मात्र तेही बंद केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येथे शिक्षण घेणा-या विद्याथ्र्यांना इतरत्र समयायोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खाजगी विद्यालय व्यवस्थित चालतात तर विद्यापीठाचे एकमेव कृषी तंत्र विद्यालय का चालत नाही ? असा सवाल तालुकावासियांमधून आता विचारला जात आहे.