उमरगा / प्रतिनिधी-उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल धस यांची आंबाजोगाई येथे नुकतीच बदली झाल्या नंतर रिक्त असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा पदभार अनुराधा गुरव यांनी स्वीकारला असून तालुक्याला प्रथमच महिला अधिकारी मिळाल्याने शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या मुली, महिलां व नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
उमरगा सोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन बाजूला कर्नाटक राज्याची सीमा असलेला तालुक्याचे ठिकाण असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व जनतेची सांगड घालून कायम येणाऱ्या काळात त्यांच्या समोर गणेशोत्सव, नवरात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुका, दिवाळी सणासह रोडरोमीओ कडून शालेय तसेच महाविद्यालयीन मुलींना होणारा त्रास, गुंडागर्दी इत्यादी प्रकारचे गुन्हे रोखणे याचे आव्हान असणार आहे. तर अवैध धंदे, अवैध प्रवासी वाहतूक, चोरी, महिला सुरक्षा, मटका, दारु, गुटखा, मांस वाहतूक, सामाजिक सलोखा, यात्रा, उत्सव, कर्मचारी शिस्त, गुन्ह्याची उकल, राजकीय दबाव, वाढत्या चो-या, जुगार यासह अन्य प्रकारची अवैध धंदे शहर व तालुक्यात खुलेपणाने सुरू आहेत.  मागील चार पाच महिन्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. एखाद्या दोन घटनेतील चोरटे वगळता अद्याप अनेक चोर्यातील चोरट्यांना पकडण्यात यश आले नाही. तालुक्यात जातीय सलोखा व शांतता अबाधित ठेवून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याचे मोठे आव्हान असेल, शिवाय या कामात त्यांची कसोटी लागणार असल्याची चर्चा पोलिस व नागरिकांतून होत आहे.

 
Top