उस्मानाबाद/प्रतिनिधी-
सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. संपुर्ण संसार साहित्य उद्ध्वस्त झाल्याने त्यांना जीवनावश्यक साहित्याची गरज भासत आहे. प्रशासन, सामाजिक संस्था, असंख्य नागरिक स्वेच्छेने पुरग्रस्तांना मदत करत आहेत. या मदत कार्याचाच एक भाग म्हणुन पोलिस अधीक्षक आर. राजा यांनी जिल्हा पोलिसांकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संकल्पना मांडली असून यासाठी साहित्य संकलन करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
या संकल्पनेला प्रतिसाद म्हणून पोलिस, सर्वसामान्य नागरिक आपल्या इच्छा व क्षमतेनुसार जीवनावश्यक वस्तू दि. 19 ऑगस्टपर्यंत राखीव पोलिस निरीक्षक अथवा पोलिस कल्याण विभाग पोलिस मुख्यालय येथे जमा कराव्यात असे आवाहन पोलिस अधीक्षक आर.राजा यांनी केले.
महाराष्ट्र राज्य पोलिस मित्र संघठना
महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेच्या वतीने शहर पोलीस स्टेशनच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सांगली व कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना अन्न व कपड्यांची मदत करण्यात आली. यावेळी पाच क्विंटल गहू, किराणा सामान व संसारोपयोगी वस्तू देण्यात आल्या. यावेळी शहर पोलिस स्टेशनचे पीआय कस्तुरे, एपीआय जाधव, पोलिस मित्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन चौधर, शहर अध्यक्ष शरद सातपुते, सामाजिक कार्यकर्ते युवराज कुराडे तसेच चंद्रकांत दुर्वे, आदित्य जानरा, सुनील दहिफोडे, अमोल पेठे, बालाजी हरभरे व तसेच पोलिस मित्र संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.