परंडा/ प्रतिनिधी-तालुक्यातील कुक्कडगाव येथे अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमानी सजविलेल्या वाहनांवर भव्य मिरवणूक काढण्यात आली. वाद्यसह ढोलताशांच्या गजरात व गगनचुंबी घोषणाबाजी करण्यात आली.
गुरुवारी कुक्कडगाव येथे अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन बहुजन वंचीत आघाडीचे नेते प्रविण रणबागुल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जयंती कमेटीचे अध्यक्ष दिनकर जाधव ,अविनाश समिंदर , माधव लांडगे, कुंदन निरवणे , विनोद निरवणे,पोपट गटकळ वंचित बहुजन आघाडी शाखाध्याक्ष अंतरवली,अजित गायकवाड आदी उपस्थित होते. या वेळी मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांसह शेकडो अनुयायीनी पिवळे वस्त्र परिधान करून डोक्यावर पिवळे फेटे तर गळ्यात पिवळे रुमाल घातलेले होते. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रेमाची घोषणाबाजी व ढोलताशांचा गजर फटाक्यांच्या आतिषबाजीने परिसर कुक्कडगाव परिसर दुमदुमला.