उस्मानाबाद/प्रतिनिधी-
मी गेल्या अनेक वर्षांपासून प्रमाणिकपणे काम करतो तरी पण अनेकदा आयुष्यात संघर्ष आला. लोकसभा निवडणुकीत आपण उजवे असताना ही पराभव झाला. पराभवामुळे खचलो नाही, गेल्या अनेक वर्षांपासून अशा चक्रव्यूहात अडकाल्यामुळे तुमच्या सर्वांच्या मदतीने व डॉ. पद्मसिंह पाटील यांची तत्पश्चर्या व्यर्थ न जावू देण्यासाठी विकासात्मक परिवर्तन करण्याचा निर्णय अंत्यत जड अंत:करणाने घेतला आहे. शरद पवार हे आमचे काल ही दैवत होते. आजही आहेत आणि उद्या ही राहणार आहेत, असे सांगून राणादादांनी भाजपा प्रवेशाचा निर्णय मी जाहीर करतो, आपणा सर्वांना पुर्वीसारखाच आदर, सम्मान मिळेल, अशी ग्वाही देत आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी परिवार संवाद कार्यक्रमात दिला.
आपल्या भाजपा प्रवेशाचा निर्णय जाहीर करण्यासाठी डॉ. पद्मसिंह पाटील, आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी परिवार संवाद या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून आपल्या कार्यकत्र्यांना येण्याचे आव्हान केले होते. लेडीज क्लबच्या झालेल्या या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते शामील झाले होते. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी आपल्या एवढे आंदोलने या सरकारच्या विरोधात कोणी केले नाही. मंत्र्यांना आडविण्याचे काम सुध्दा मी तुमच्या मदतीने केले. पण आपल्या समस्या कांही सुटल्या नाहीत. गेल्या २० वर्षांपासून कृष्णा-खा-यांचे पाणी मिळावे म्हणुन प्रयत्न चालू आहेत. कौंडगाव एमआयडीसी मध्ये उद्योग आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.पण फलनिष्पत्ती कांहीच मिळत नाही. त्यामुळे राजकीय ताकद वाढविण्यासाठी व सकारात्मक, विकासात्मक राजकारणासाठी हे परिवर्तन करीत आहेत. तुम्ही माझे कृष्ण आहात मला मार्गदर्शन करा आणि साथ द्या । मी अर्जुंनासारखा लढेन असेही आ.पाटील यांनी भाषणात सांगितले. यावेळी डा. पद्मसिंह पाटील यांनी आपल्याला आजपर्यंत ज्या प्रमाणे साथ दिली. त्याप्रमाणे येथुन पुढे पण द्यावी, असे आवाहन केले. यावेळी सुरेश देशमुख, संदीप मडके, युवराज नळे, मसुद शेख, दत्ता बंडगर, शिवदास कांबळे, अमोल पाटोदेकर, रेवण लामतुरे आदींची भाषणे झाली.
विशेष म्हणजे....
शनिवार दि.३१ ऑगस्ट रोजी झालेल्या उस्मानाबाद बसस्थानक भूमीपुजन कार्यक्रमात व आ. राणापाटील यांनी घेतल्या परिवार संवाद कार्यक्रमात महाभारताचा संदर्भ घेऊन कृष्ण-अर्जुन, चक्रव्यूह आदींचा उल्लेख दोनीही कार्यक्रमात करण्यात आला.त्यामुळे जिल्हयात पुढे काय महाभारत घडणार याकडे जिल्हावाशियांचे लक्ष लागले आहे.