उस्मानाबाद /प्रतिनिधी-जिल्ह्यातील टॉवर बाधित शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध टॉवर कंपनी व जिल्हा प्रशासनाकडे लढा देत होते. अखेर प्रहार जनशक्ती पक्षाचे तुळजापूर विधानसभा अध्यक्ष अण्णासाहेब दराडे यांच्या माध्यमातून ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याकडे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही झाल्यास सामुदायिक आत्महदन करण्याचा इशारा देण्यात आलेला होता. आज शेकडो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन धडकले असता जिल्हा प्रशासनाने सदर बाबत सकारात्मक चर्चा करण्यास तयारी दाखवल्याने आत्मदहनास स्थगिती देऊन दिवसभर आंदोलन करण्यात आले. आ. बचु कडू यांच्याकडून चर्चेसाठी पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष संतोष पवार यांच्या अध्यक्षतेखाली अण्णासाहेब दराडे, केदार सौदागर विनोदशिंग परदेशी,भीमराव पाटील तसेच शेतकऱ्यांच्या वतीने adv. आशिष पाटील या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी मा. राजेंद्र खंदारे यांच्याशी चर्चा करून दोन विषयावर आंदोलनाला स्थगिती दिली. मा. खंदारे साहेब यांनी पत्राद्वारे सर्व शेतकऱ्यांचे जमीन, घर, विहीर , फळझाडे, पीक इत्यादीचे पुन्हा मोजणी व पंचनामे करण्याचे आदेश संबांधित अधिकाऱ्यांना तात्काळ दिले. तसेच सर्व शेतकऱ्यांची मागणी प्रत्येक टॉवर ला 25 लाख मिळावे ही होती. त्यासाठी मा. आ. बचु भाऊ कडू यांच्या माध्यमातून ऊर्जामंत्री मा. बावनकुळे साहेब यांच्याकडे बैठक करण्याचे ठरले आहे. तरी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की प्रहार कार्यकर्त्यांशी संपर्कात राहून आपले मोजमाप व पंचनामे व नुकसान मूल्यांकन करून घ्यावे.सदर आंदोलनात प्रहारचे मनोज जाधव , दयानंद राठोड, प्रजय पवार, सोमनाथ झाडे बालाजी डोळे, विजय नागरगोजे गोपाळ घुगे तसेच केसेगाव,इटकळ, येवती, खंडाळा, बामणी महादेववाडी, कणघरा, बोरखेडा, समुद्रवाणी, पाडोळी, रायखेल, यमगरवाडी, तीर्थ, दस्तापुर, येणगुर, कोराळ, भोजगा या गावांचे शेतकरी उपस्थित होते.