उस्मानाबाद,/प्रतिनिधी:- आय.एम.ए, डब्ल्यू डी. डब्ल्यू ,आय.एम.ए, रोटरी क्ल्ब व जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विदयमाने जागतिक अवयवदान दिन व आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त आज जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, नगर परिषद अध्यक्ष मकरंद नंदू राजेनिंबाळकर, उपसंचालक डॉ.एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राज गलांडे-पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री. सुधाकर भोसले, डब्ल्यू.डी.डब्ल्यू, आय.एम.ए. अध्यक्षा डॉ.मीना जिंतूरकर, आय.एम.ए. चे अध्यक्ष डॉ.सचिन देशमुख तसेच अधिसेविका श्रीमती शकुंतला गोरे, परिचारिका प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य श्री. अमोल गरड यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी जिल्हा रुग्णालयातील परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या व्दितीय वर्षातील प्रशिक्षणार्थ्यांनी व श्री.स्वामी समर्थ मूकबधीर विदयालयातील विदयार्थ्यांनी अवयवदानाविषयीचे पथनाटय सादरीकरण केले. यावेळी उस्मानाबाद जिल्हयातील अवयवदाते कुटुंबाचे सदस्य श्री. शिवशंकर कोळी व श्री. हनुमंत चव्हाण यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या रॅलीची सुरुवात जिल्हा रुग्णालय येथून होऊन काळा मारुती चौक, ताजमहाल टॉकीज, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, संत गाडगे महाराज चौक, शहर पोलिस स्टेशन मार्गे जिल्हा रुग्णालय येथे सांगता करण्यात आली. या रॅलीकरिता उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय, श्रीपतराव भोसले माध्यमिक
व उच्च माध्यमिक विदयालय, रामकृष्ण परमहंस महाविदयाल व परिचारिका प्रशिक्षण केंद्रातील विदयार्थ्यी व शिक्षकांनी सहभाग नोंदविला.
या रॅलीच्या यशस्विततेकरिता जिल्हा रुग्णालयातील राष्ट्रीय एड्स नियंत्रण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच रुग्णालयातील वैदयकीय अधिकारी,नर्सिंग स्टॉफ व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .