प्रतिनिधी /उस्मानाबाद-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपपरिसरातील विविध विकास कामांना गती देण्यात येईल, प्रश्नांची सोडवणूक करू, अशी ग्वाही मा. कुलगुरू डॉ. प्रमादे येवले यांनी दिली. 
अधिसभा सदस्य प्रा. संभाजी भोसले यांनी सोमवारी (दि. ५) कुलगुरू डॉ. येवले यांची भेट घेऊन सत्कार केला. यावेळी त्यांनी उस्मानाबाद उपपरिसर येथील विविध विषयांवर चर्चा केली. यामध्ये उपपरिसर येथे विद्यार्थी वसतिगृह पूर्णवेळ संचालक आदी प्रश्न प्रा. संभाजी भोसले यांनी मांडले. उपपरिसरात येत्या १६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमात एका मान्यवरास पुरस्कार देण्यासाठी घेतलेला निर्णय तसेच या बैठकीत केवळ उस्मानाबाद उपपरीसर येथील विषय मांडण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे, असेही कुलगुरू म्हणाले. उपपरिसर स्थापना होऊन १५ वर्षे लोटली आहेत. आगामी काळात शैक्षणिक व प्रशासकीय विकास करण्यात येईल, अशी ग्वाही कुलगुरू यांनी दिली. 

 
Top