कलंब/प्रतिनिधी-
स्फूर्ती फाऊंडेशन, कळंब सामाजिक कार्यात वेगवेगळे उपक्रम राबवत असते. यावर्षी 3500 वृक्ष लागवडीचा संकल्प संस्थेने सोडला आहे. त्याचाच भाग म्हणून कोंड ता.उस्मानाबाद येथील जिल्हा परिषद शाळा येथे वृक्ष भेट उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळेच्या प्रांगणात वृक्ष लागवड व विद्याथ्र्यांना घरी व शेतात लागवडी करिता उपयुक्त चिंच, जांभळं, सीताफळ, बांबू चे रोपं भेट देण्यात आली. यावेळी स्फूर्ती फाऊंडेशन चे अध्यक्ष शिवाजी गिड्डे, सचिव मकरंद पाटील, सामाजिक कार्यकर्ते शिवराज नायगावकर, विकास वाघ,भारत लोंढे,मुकुंद शेळके,शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.