उमरगा/प्रतिनिधी-
कॉग्रेसने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. नेहरुंनी देशात मोठमोठी धरण बांधुन, उद्योग क्षेत्रात मोठी झेप घेतली. इंदिराजींनी गरीबी हटावची योजना आणली. बांगलादेशाची निर्मिती करुन जगाचा भुगोल बदलला. पण याचा उपयोग राजकारणासाठी कधीही केला नसल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. बसवराज पाटील यांनी केले.
विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना आ. पाटील म्हणाले की, राजीव गांधी हे दुरदृष्टीचे नेते होते. पुढील 50 वर्षाचा विचार करून त्यांनी विविध क्षेत्रात काम केले होते. देशाच्या प्रगतीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांचे खुप मोठे योगदान आहे. जागतिक पातळीवर देशाची शान व मान उंचावण्यासाठी त्यांनी काम केले. रोजगार निर्मिती मोठया प्रमाणावर संधी उपलब्ध करून दिली. घटना दुरुस्ती करून
पंचायत राज निवडणुका दर पाच वर्षाला घेणे व केंद्र सरकारचा निधी सरळ या संस्थांना वर्ग करण्याचे धोरण त्यांनी आखले होते. त्यामुळे सतर्कतेचे विकेंद्रीकरण झाले आहे व आज या संस्था सक्षम झाल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात अन्न सुरक्षा योजनेमुळे गरीबांचा मोठा फायदा झाला. सध्या देशात मंदी सुरू आहे. भविष्यात ही मंदी मोठ्या प्रमाणावर दिसुन येण्याची भिती असुन जीएसटी व नोटबंदीचे हे फळ असल्याचा घाणाघात त्यांनी केला. राज्यातल पुर परिस्थिती गंभीर आहे. मराठवाड्यात भिषण दुष्काळ आहे. सरकारला यांचे गांभीर्य नाही. नियोजन नाही परिणामी जनतेचे हाल होत आहेत. अशा भिषण दुष्काळात मजुरांच्या हाताला काम नाही. शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. प्रशासनाच्या चुकीमुळे जिल्ह्यातील जे शेतकरी विम्यापासुन वंचित राहिले आहेत अशा शेतक-यांना विमा मिळणे गरजेचे आहे.
(राष्ट्रवादी काँग्रेस, वंचितसह समविचारी पक्षांना सोबत घेऊन विधानसभा निवडणूकीत आघाडी करुन निवडणूक लढवण्यात येईल. आणि आघाडी सत्तेवर येईल. उमरगा विधानसभा ही कॉग्रेसकडे आहे. आणि उमरगा-लोहारा तालुक्यातील सर्व प्रश्नांची जाण असलेला, सर्वांना सोबत घेऊन जाणारा उमेदवार देण्यात येईल.)
(विकासापासून वंचित राहिलेल्या औसा तालुक्यात जलसंधारणाची कामे केली. तेरणा नदीवर बॅरीगेट्स बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केला. जलसंधारणाच्या कामावर मराठवाड्यात सर्वाधिक निधी खर्च औसा मतदारसंघात करण्यात आला आहे. पशुसंवर्धन, तहसील, न्यायालय, पंचायत समिती आदीसह प्रशासकीय इमारत, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निवासी शाळेच्या टोलेजंग इमारती उभ्या केल्या. लामजना येथे देशातील दोन नंबरचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभा केला. बंद पडलेला किल्लारी सहकारी साखर कारखाना सुरू करुन 28 कोटी रुपये भरुन कारखाना कर्जमुक्त केला. औसा एम. आय. डी. सी. मध्ये विविध सवलती देऊन सर्व सोयी पुरवुन नविन उद्योगधंदे उभा केले व अनेक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. नविन पीएससी साठी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. मतदारसंघातील सर्व रस्त्यांचे जाळे तयार केले.
दहा वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर आम्ही निवडणूकीला सामोरे जाणार आहोत. दहा वर्षात केलेल्या विकासकामांचा विचार करून औसेकर पुन्हा सेवा करण्याची संधी देतील असा आत्मविश्वास त्यांनी बोलून दाखवला