तुळजापूर/प्रतिनिधी-येथील कृषी तंञ विद्यालय बंद केले आहे ते तात्काळ चालु करण्यात यावे या मागणी चे निवेदन तहसिलदार यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वातीने शनिवार दि 3 ऑगस्ट रोजी देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सन 2004 पासुन तुळजापूर तालुक्यातील तसेच तुळजापूर शहरालगत असणा-या कृषी तंत्र विद्यालयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीची सोय मोठ्या प्रमाणात झाली होती. या पुर्वी विद्यार्थाना प्रवेश घेण्यासाठी सोलापूर, लातुर, नांदेड, परभणी इत्यादी ठिकाणी जावे लागायचे या मुळे विद्यार्थाना मोठा अर्थीक फटका सहन करावा लागत होता. सदरील महाविद्यालय वेगवेगळे कारण सांगुन बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. हे महाविद्यालय विना अनुदानित असल्यामुळे याची फिस विद्यर्थाना परवडत नाही तसेच विद्यार्थीची पट संख्या कमी झाली आहे, अशी कारणे देण्यात येत आहेत. याबाबत संबंधीत विद्यापीठाने शासनाकडे अनुदानित महाविद्यालय करण्या संबंधी पाठपुरावा करायचा सोडून महाविद्यालय बंद करायचा अन्यायी निर्णय लादत आहेत. तरी यात शासनाने लक्ष घालुन सदरील महाविद्यालय अनुदानीत अथवा अनुदानित महाविद्यालय प्रमाणे फीस अकारीन सुरू ठेवावे तर प्रवेश संख्या ही मोठ्य प्रमाणात वाढल्याची दिसुन येईल व महाविद्यालयाने अथवा विद्यापीठाने प्रवेश संख्या वाढीसाठी जनजागृती करायचे सोडून महाविद्यालय बंद पाडायचे ठरवले आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून महाविद्यालय पुर्वरत चालु ठेवण्यात यावे व विद्यार्थाचे होणारे नुकसान टाळाले गेले नाही तर मनसे च्या वतीने अंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, मयुर गाढवे ,धनाजी साठे, रोहित दळवी ,प्रशांत डोलारे, झुंबर काळदाते, सागर जगताप, अक्षय साळवे, राहुल गायकवाड, उमेश कांबळे, अविनाश पवार , अकाश पवार, रूषी माने व मनसैनिकांचे स्वाक्ष-या आहेत.