उस्मानाबाद (प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघटना जिल्हा शाखेच्या वतीने सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी 33 हजार रूपये आर्थिक मदत देण्यात आली. ही मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द करण्यात आली. या मदतीचा धनादेश उपविभागीय अधिकारी (महसूल) चेतन गिरासे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
पोलिस पाटील संघटेनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत देवकते पाटील, जिल्हा सचिव धनंजय गुंड पाटील, मिडीया जिल्हाध्यक्ष सुभाष कदम-पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राहुल वाकुरे,उस्मानाबाद तालुका अध्यक्ष ज्योतीराम काटे पाटील, तुळजापूर तालुकाध्यक्ष मधुकर चव्हाण पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.