उस्मानाबाद/प्रतिनिधी-पुणे जिल्हयात मुसळधार पावसामुळे सर्वच धरणे
पुर्ण क्षमतेने भरली असल्याने दौंड, बंडगार्डन येणा-या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग यामुळे सांगली जिल्हयातील वरदान असलेल्या कृष्णानदीला पुर आला होता. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्हयामध्ये आलेल्या पुर व या पुराच्या पाण््याने या भागातील लोकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
या पुरस्थितीत त्यांना मदत रूपी आधार देण्यासाठी उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी गावातील नागरिकांनी पुढाकार घेत लेखा विभागाचे तहसीलदार राजाराम शेंदुरकर यांच्याकडे मदत सुर्पूद केली.यावेळी किरण चव्हाण, तेजस गोसावी , सागर शिंदे, गोपाळ सोनटक्के, ऋषी व्हनसनाळे आकाश पाटील व अन्य ग्रामीण मोठया संख्येने उपस्थित होते.