उस्मानाबाद /प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये उस्मानाबाद जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत, उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व जिल्हाधिकारी दिपा मुधोळ.-मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
या बैठकीत उस्मानाबाद नगर परिषदेचे अध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांना लोकसंख्येनुसार निधी वितरित करण्यात यावा अशी मागणी केली. त्या सोबत सिध्दार्थ बनसोडे यांनी या मागणी पाठींबा दिला. त्यानुसार उस्मानाबादचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी लोकसंख्येनुसार निधी देण्यात येईल असे सांगून सांगून मांगणी मंजूर केली.
उस्मानाबाद शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा उभारणीसाठी शासकीय दुध डेअरी च्या जागेची मागणी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर व सिध्दार्थ बनसोडे यांनी केली असता दुध डेअरीची जगा प्रशासकीय बाबी तपासून नगर पालिकेकडे वर्ग करण्यात येईल असे सांगण्यात आले. त्यानंतर रमाई आवास योजनेसाठी वाढीव निधीची मागणीही करण्यात आली लोकसंख्येनुसार निधी वितरित मागणी मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री तानाजी सावंत यांचे आभार नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर व भुमच्या उपनगराध्यक्षा सौ. संयोगिता ताई गाढवे ,मुरूमच्या नगराध्यक्षा सौ.अंबर ताई व नगरसेवक तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सिध्दार्थ बनसोडे यांनी मानले.