लोहारा/प्रतिनिधी-
लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.विनोद धोंडीराम आचार्य यांना स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड कडून त्यांना पीएच.डी प्रदान करण्यात आली. त्यांनी "अस्पृश्याच्या राजकीय समतेसाठी डॉ. आंबेडकरांनी केलेला पुणे करार : एक चिकित्सक अभ्यास" या विषयावर संशोधन केले. त्यांनी डॉ यशवंत खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ.एस.व्ही. फड यांच्या सहमार्गदर्शनखाली  यांनी संशोधन पूर्ण केले. बहिस्थ परीक्षक म्हणून स.भू. महाविद्यालय, औरंगाबाद  येथील प्रा.डॉ. नवनाथ आघाव हे होते. या वेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील सामाजिक शास्त्र विभागाचे संचालक डॉ. ए. आय. शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे समाज शास्त्र अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा. डॉ. नारायण कांबळे, सिनेट सदस्य डॉ. विजापूरे, प्रा. डॉ.आर.डी. आचार्य व प्रा.डॉ. उमाकांत वानखेडे या यांची प्रमुख उपस्थिती होती. यशाबद्दल यावेळी भारतीय राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री दिनकरराव जावळे पाटील यांनी अभिनंदन केले. तसेच प्राचार्य बी बी मोटे व श्री विनोद जावळे पाटील यांनीही अभिनंदन केले. तसेच या यशाबद्दल प्रा.डॉ.
विनायक पाटील, प्रा पी के गायकवाड, प्रा.डॉ एस. एस.कदम, प्रा.डॉ बी.एस.राजोळे,प्रा.डॉ एस.व्ही.सोनवणे, प्रा.डॉ आर एम सूर्यवंशी, प्रा.डॉ सी जी कडेकर, प्रा. डॉ पी व्ही माने, प्रा.डॉ एम. एल. सोमवंशी, प्रा.आर. एस. धप्पाधुळे, प्रा.डी एन कोटरंगे, प्रा एस.एन. बिराजदार, प्रा डी व्ही बंगले, प्रा. एन.व्ही. व्ही.
अष्टेकर, प्रा. पी.बी.मगर, श्री बालाजी सगर, डॉ शिरीष देशमुख, एन.बी.माने, पी.यु. पाटील, श्री प्रकाश राठोड, श्री संजय फुगटे, श्री परमेश्वर कदम, आदी  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
 
Top